|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंजर्ले खाडीत बोट बुडाली

आंजर्ले खाडीत बोट बुडाली 

दापोली / प्रतिनिधी :

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत वक्रतुंड बोट दोन दिवसांपूर्वी बुडाली. तळातून पाणी बोटीत घुसल्याने ती पहाटेच्या अंधारात खाडीच्या पाण्यात बुडून बोटीचे मालक वसंत लाया चोगले यांचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले.

वसंत चोगले यांनी आपली वक्रतुंड ही बोट आंजर्ले खाडीत रात्री उभी करून ठेवली होती. मात्र तिच्या तळाकडून फळी सुटल्याने तिच्यात पाणी भरू लागले. ही बाब सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनात आल्यावर मधुकर चोगले, भगवान वाघे, महेंद्र खोपटकर, प्रवीण खोपटकर, पांडुरंग चोगले, क्रीष्णा चोगले, अंकुश चोगले, विष्णू चोगले, गोपाळ पावसे, लखमा तांडेल, नारायण चौलकर, वासूदेव खोपटकर, नारायण चोगले व असंख्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच 5 पंपांच्या सहाय्याने बुडणाऱया बोटीतील पाणी बाहेर काढले. यानंतर अपघातग्रस्त बोट किनाऱयाला आणून उभी केली. मात्र या दुर्घटनेत बोटीचे केबीन, फळय़ा, इंजिन, डोली, डिझेल बॅरल, पाण्याचे बॅरल आदी सामानाचे व बोटीचे मिळून सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले. मात्र कोळी बांधवांसाठी कोणतेही नुकसान झाले तरी सानुग्रह अनुदान नसते किंवा आपत्कालिन योजना नसते. यामुळे त्यांना कोणत्याही स्वरूपाची नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा दुर्घटना झाल्यावर अपघातग्रस्त कुटुंबाला काही ना काही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वसंत चोगले व अलका चोगले यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना केली.