|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » …तर भाजप नसबंदी करेल : धनंजय मुंडे

…तर भाजप नसबंदी करेल : धनंजय मुंडे 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

जनता आता सावध झाली नाही, तर भाजप आता नसबंदीही करेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केला.

अहमदनगर येथे आयोजित पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात मुंडे बोलत होते. ते म्हणाले, 8 नोव्हेंबरला नोटाबंदी करण्यात आली. नेमक्या त्याचवेळी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. बहुसंख्य नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने यश मिळवले आहे. त्यानंतर भाजपचे नेतेच म्हणाले होते, हमने नोटाबंदी की है, तो भी जनता हमारे साथ है. या विधानाचा समाचार घेत मुंडे म्हणाले, जिल्हा परिषद – पंचायत समितीमध्ये तुम्ही चुकलात, तर तुमची नसबंदी नक्कीच आहे.

Related posts: