|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » राजीनामे द्यावे लागतात ; मा. गो. वैद्यांचा सेनेला टोला

राजीनामे द्यावे लागतात ; मा. गो. वैद्यांचा सेनेला टोला 

ऑनलाईन टीम / नागपूर :

राजीनामे खिशात ठेवून चालत नाही तर ते द्यावे लागतात, असे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेला दिले. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तर त्या पक्षात फूट पडेल, असे भविष्यही त्यांनी वर्तवले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैद्य बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे मंत्री राजीनामा देतील असे मला वाटत नाही. राजीनामे खिशात ठेवायचे नसतात तर ते दिले पाहिजे. शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळाले आहे. देसाईंसारखे काही मंत्री चांगले कामही करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिले तर त्यांच्यातच फूट पडेल, असे भाकित वर्तवत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला.

दरम्यान, शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, या निवडणुकांना सामोरे जाण्याची शिवसेनेची तयारी आहे का, असा सवालही वैद्य यांनी उपस्थित केला.

Related posts: