पंतप्रधानांची सीबीआय चौकशी करा ; केजरीवालांची मागणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान कार्यालयाने जसा निवडणुकीदरम्यान डिजिटल प्रचार करण्याचा मार्ग निवडला. अशाच मार्गाचा अवलंब करत मनीष सिसोदिया यांनी प्रचार केला. मात्र, पंतप्रधानांनी त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आता पंतप्रधानांचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
जसे पंतप्रधान कार्यालयाने डिजिटल प्रचार करण्याचा मार्ग निवडला. असाच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील याचप्रकारे प्रचार केला. मात्र, त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आता पंतप्रधानांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केजरीवाल करत आहेत.