|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाली बौध्दवाडीत विहीर खोदाईवेळी बाका प्रसंग टळला

पाली बौध्दवाडीत विहीर खोदाईवेळी बाका प्रसंग टळला 

ट्रॉली तुटून पडल्यामुळे दोन कामगार जखमी, अन्य चार कामगार सुदैवाने बचावले

अवजड भारामुळे ट्रॉली विहीरीत मध्यभागी कोसळली.

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

सार्वजनिक विहीरीची खोदाई सुरू असताना पुलिंग ट्रॉली विहीरीत कोसळली. त्याबरोबर ट्रॉलीवर असलेले दोन कामगारही विहीरीत कोसळून मोठा बाका प्रसंग टळला. सुदेवाने या घटनेत विहीरीत कोसळलेले कामगार ट्रॉलीबाहेर फेकले गेल्याने ते जखमी झाले. ही घटना पाली बौध्दवाडी येथे शुक्रवारी घडली आहे.

पाली बौध्दवाडी येथे सार्वजनिक विहीरीच्या खोदाईचे काम सुरू आहे. सुमारे 40 फुट उंचीची ही विहीर असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या विहीरीच्या खोदाईच्या कामात कामगार गुंतलेले होते. ठेकेदारामार्फत ही विहीर खोदाई सुरू असून नुतनीकरणाचे काम केले जात आहे. यादिवशी 6 कामगार काम करत होते. या कामात विहीरीची रुंदी 22 फुट करण्यात आली आहे. आतील भागात विहीरीच्या बांधणीसाठी ट्रॉलीच्या सहाय्याने चिरे सोडण्यात येत होते. त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त भार ट्रॉलीवर पडल्याने ती विहीरीत कोसळली.

ट्रॉली विहीरीत पडताच त्यावर काम करणारे दोन कामगारही विहीरीत कोसळले. मात्र दोघेही ट्रॉलीपासून बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या प्राणावरचे संकट कोसळले. दोघेही विहीरीतील वाढीव व्यासाच्या बाजूवर पडल्याने ते बचवले. मनोहर जाधव व सुनिल जाधव अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना जोरदार मुका मार लागल्याचे सांगितले जाते. दोघे विहीरीत पडल्याचे पाहून सोबत असलेल्या सहकारी कामगारांनी जोरदार आरडाओरड केली. त्याबरोबर तेथे असलेला कामगार संजय कांबळे व ठेकेदार चव्हाण यांनी तातडीने विहीरीत कोसळलेल्या दोघांनाही बाहेर काढण्यासाठी धावपळ केली. ट्रॉली विहीरीत पडण्याच्या वेळेत काम करत असलेल्या अन्य चार कामगारांनी सुरक्षितता बाळगली. मात्र ट्रॉली मध्यभागात पडल्याने सर्व कामगार सुदैवाने बचावल्याचे सांगण्यात आले. जखमींना पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.