|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » उद्योग » एसबीआयच्या नफ्यात 134 टक्क्यांनी वृद्धी

एसबीआयच्या नफ्यात 134 टक्क्यांनी वृद्धी 

वृत्तसंस्था/ मुंबइ

व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि अतिरिक्त उत्पन्नामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात नफ्यात 134 टक्क्यांनी वाढ झाल्याचे भारतीय स्टेट बँकेने म्हटले. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेला 2,610 कोटी रुपयांचा नक्त नफा झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला 1115.34 कोटी रुपये नफा झाला होता. 2017 च्या तिसऱया तिमाहीत एसबीआयच्या व्याज उत्पन्नात 7.7 टक्क्यांनी वाढ होत 14,752 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत हे उत्पन्ना 13,397 कोटी रुपये होती.

तिमाहीच्या आधारे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एसबीआयचे एकूण अनार्जित कर्ज 7.14 टक्क्यांवरून 7.23 टक्क्यांवर पोहोचले. तिसऱया तिमाहीत बँकेचे एकूण अनार्जित कर्ज (एनपीए) 1.06 लाख कोटी रुपयांवरून 1.08 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षाच्या तुलनेत बँकेचे अन्य उत्पन्न 58.73 टक्क्यांनी वधारले. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 6,086 कोटी रुपयांवरून 9,661 कोटी रुपयांवर पोहोचले. बँकेकडील ठेव रकमेत 22.1 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी बँकेकडे 14.48 लाख कोटी रुपये ठेव होती. डिसेंबरमध्ये ही रक्कम 20.41 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

Related posts: