|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्रांतीसाठी नादालची माघार

विश्रांतीसाठी नादालची माघार 

वृत्तसंस्था/ द हेग, हॉलंड

पुढील आठवडय़ात होणाऱया रॉटरडॅम एबीए ऍमरो टेनिस स्पर्धेतून स्पेनच्या राफेल नादालने माघार घेतली आहे. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने ट्विटरवरून सांगितले.

स्पर्धा आयोजकांनी नादालला या स्पर्धेत अग्रमानांकन दिले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अंतिम फेरी गाठून सर्वांनाच त्याने चकित केले होते. पण पाच सेट्सच्या अंतिम लढतीत त्याला फेडररकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मेलबोर्नमधील अनपेक्षित कामगिरीनंतर डॉक्टरांनी त्याला पुढील सामने खेळण्याआधी पुरेशा विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. स्पर्धा संचालक रिचर्ड क्रायसेक यांनी नादालच्या जागी फेडरर किंवा अव्वल पाचपैकी एखादा खेळाडू मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. गेल्या मंगळवारी वावरिंकानेही गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.