|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » Top News » मावळमध्ये प्रसादातून अडीचशे भाविकांना विषबाधा

मावळमध्ये प्रसादातून अडीचशे भाविकांना विषबाधा 

ऑनलाईन टीम / पुणे :

मावळ मधील पाचाणे गावात पेढय़ाच्या प्रसादातून अडीचशेहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पायाबा महाराजाच्या उत्सवानिमित्त आयोजित उरूसाससाठी पेढय़ाचा प्रसाद होता त्यातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रसाद खाल्ल्यावर अनेक ग्रामस्थांना उल्टीचा त्रास होऊ लागला. अनेकांना तात्काळ गावकऱयांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधितांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. रूग्णांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच जवळपास 12 ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून 250 हून अधिक रूग्णांना वेगवेगळय़ा आठ ते नऊ रूग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांची एक टीम पाचणे गावात दाखल झाली आहे.