|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बीएसएफ जवान तेजबहादूरचे पाकिस्तान कनेक्शन ?

बीएसएफ जवान तेजबहादूरचे पाकिस्तान कनेक्शन ? 

नवी दिल्ली

: बीएसएफ जवान तेजबहादूर यादव याच्याद्वारे करण्यात आलेल्या निकृष्ट भोजन संबंधी आरोपांवर सरकारी सूत्राने आरोप आधारहीन असल्याचे म्हटले. आरोप करणाऱया जवानाच्या सोशल मीडिया खात्यावर मोठय़ा संख्येत पाकिस्तानी पेंड असल्याने याच्याशी संबंधित चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. बीएसएफच्या तपास पथकाने तेजबहादूरने चित्रफीत पोस्ट केल्यानंतर त्याचे पूर्ण खाते धुंडाळले. यात त्याचे 17 टक्के प्रेंड पाकिस्तानी असल्याचे समोर आले. याचबरोबर यात वापरण्यात आलेल्या हॅशटॅगवर देखील प्रश्न निर्माण होत आहेत. तेजबहादूरच्या नावाने फेसबुकवर 40 खाती आहेत. यातील 39 खाती बनावट आहेत. तपास यंत्रणांची यावर नजर आहे. तेजबहादूरच्या फेसबुक खात्यावर 3000 पेक्षा अधिक प्रेंड आहेत. यातील अनेक जण कॅनडा, टांजानिया सारख्या देशातील आहेत. पाकिस्तानी वंशाचे लोक तेजबहादूरच्या चित्रफितीला शेअर करत आहेत. याआधी शुक्रवारी त्याच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणीवेण दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला जवानाची भेट घडवून आणण्याचा निर्देश दिला होता.

 

 

 

 

Related posts: