|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रवेशबंदीसाठी नवा आदेश आणणार ट्रम्प

प्रवेशबंदीसाठी नवा आदेश आणणार ट्रम्प 

वॉशिंग्टन :

 7 मुस्लीम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यासाठी आपण नवा कार्यकारी आदेश आणू असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर प्रवेशबंदीच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. परंतु न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली.

याविषयी निर्णय सोमवारी किंवा मंगळवारी घेतला जाऊ शकतो असे शुक्रवारी एअरफोर्स वनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. याप्रकरणी अनेक पर्याय असून यात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणे समाविष्ट असल्याचे व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ रिइन्स प्रिवस यांनी म्हटले.

प्रवेशबंदीबाबत कायदेशीर अडचणींमुळे यात विलंब होत आहे, परंतु अखेर न्यायालयात आपलाच विजय होईल. दुर्दैवाने यात विलंब होतोय. आमच्याकडे अनेक पर्याय असून आम्ही नवा आदेश आणू शकतो असे ट्रम्प यांनी सांगितले.

न्यायालयाने फेटाळली बंदी

गुरुवारी 3 न्यायाधीशांच्या अपीलीय न्यायालयाने प्रवेशबंदी स्थगित केली होती. याआधी मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाने देखील असाच निर्णय दिला होता. यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. अमेरिकेत जर कोणतीही चुकीची घटना घडली तर याला येथील न्यायालयेच जबाबदार असतील असे त्यांनी वक्तव्य केले होते.