|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अकलूजमध्ये मटका अडय़ावर छापा

अकलूजमध्ये मटका अडय़ावर छापा 

प्रतिनिधी/ सोलापूर

अकलूज येथील मटका अडय़ावर पोलिसांनी छापा टाकून एकून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात पोलिसांनी अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केले आहे.

पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यापार्श्वभूमिवर अकलूज भागात पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी खबऱयांकडून माहिती मिळाली की, शहरातील काही भागात मटका सुरू आहे. या मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी जुने बस स्थानक, विजय चौक, बायपास चौक, शिवनेरी तालीम परिसर आणि सदाभाऊ चौक आदी भागात छापा टाकले सापळा रचून छापा टाकले. या प्रकरणी दहा लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल अडीच लाख किंमतीचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे.    

लक्ष्मीकांत यशवंत खुरूडकर, ताहेरअली युसूफअली बागवान, पप्पू पन्नालाल लकेरी, नारायण दामू जगदाळे, मारूती अंबादास तिवारी, शशिकांत आदिनाथ फडतरे, लक्ष्मण दशरथ मसुगळे, विशाल गोरख रूपनवर, आकाश अशोक मोरे आणि सिकंदर सलिम शेख (सर्व रा. अकलूज) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

तसेच सलिम शेख, नझिम मुल्ला, अमिर शेख, बंडू डोंगरे, मधुकर आव्हाड या मटका मालकांच्या विरूद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक अमृत खेडकर, मिलींद कांबळे, प्रवीण पाटील, बाळराजे घाडगे, अमोल माने, नितीन चव्हाण, सुरेश लामजने, अमोल जाधव, पांडूरंग केंद्रे आणि महादेव लोंढे यांनी केली आहे.