|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उन्हाळ्य़ाच्या तोंडावर पाणी टंचाई

उन्हाळ्य़ाच्या तोंडावर पाणी टंचाई 

प्रतिनिधी/ दहिवडी

माण तालुक्यात सलग दोन वर्षापासून बिजवडी व हवालदारवाडी या दोन गावांना  टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. या दोन गावांसह तीन वाडय़ा-वस्त्यांना दोन टँकरच्या तीन खेपाद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्य़ाच्या तोंडावर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. टँकर व विहीर अधिग्रहणासाठी आणखी मागणी प्रस्ताव येवू लागले आहेत.

सध्या बिजवडी गावठाण, हायस्कूल परिसर, हवालदारवाडी गावठाण, गायकवाड वस्ती येथे पाणी टँकर सुरु आहे. तेथे दोन पाण्याचे टँकर सुरु असले तरी, लोकसंखेच्या मानाने टँकर अपुरे पडत आहेत. उन्हाची दाहकता जशी वाढू लागली आहे. तशी पाण्याची मागणी वाढू लागली आहे. बिजवडी परिसरात या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने भूगर्भातील पाणीसाठा वाढला नसल्याने, परिणामी या पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बिजवडीसाठी दहिवडी प्रादेशिक तर हवालदारवाडी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कारखेल जीवन प्रादेशिक योजनेतून फाणी टँकर भरून आणले जातात आहेत.

पाण्यासाठी माण पंचायतीत अर्ज

पाणी टंचाईच्या अनुशंगाने माण तालुक्यात आताच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. टँकर सुरु करण्यासाठी  विविध गावांकडून माण पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे अकरा गावांचे पंधरा मागणी प्रस्ताव आले आहेत.

पांगरी, बिदाल, राजवाडी, वडगाव, पाचवड, जाधववाडी, बिजवडी वाढीव, पाचवड वाडी-वस्ती, पळशी गावठाण, याही गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. या गावांचा टँकर मागणी प्रस्तावामध्ये समावेश आहे. ऐन हिवाळा संपतो न् संपतोच पाण्याच्या झळा विविध गावांना उन्हाळय़ाच्या अधिच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे येणाऱया तीव्र उन्हाळय़ात याची परिस्थिती खुपच बिकट पहायला मिळणार आहे.  दहिवडी कारखेल फिल्डिंग पोईंट टँकर भरण्यासाठी आणखी नवीन विहिरी अधिग्रहण करण्यात येणार आहेत. पाचवड गावठाण, कुकुडवाड, कारंडवाडी, शिंदी खुर्द या गावातील विहिरी अधिग्रहण कण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

विहीर अधिग्रहण व टँकर सुरु करण्या संदर्भात माण तहसील कार्यालाकडे प्रस्ताव  देण्यात आले आहेत.