|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पोलिसांची दया अन् वडिलांचे सहकार्य यामुळेच नान्या बनला सराईत

पोलिसांची दया अन् वडिलांचे सहकार्य यामुळेच नान्या बनला सराईत 

प्रतिनिधी/ सातारा

कोई चोर अपनी माँ की कोक से पैदा नही होता, उसे आपका सिस्टीम, समाज चोर बनने से मजबूर करता है… हा अमिताभचा डायलॉग लिंब येथील अभिजीत पवारने खोटा असल्याचे सिध्द केले आहे. कारण अगदी लहाणपणापासूनच त्याला चोरीची सवय. यामुळे गावकरी देखील लहान आहे, खोडकर आहे म्हणून द़ुर्लक्ष करीत. परंतु तो बारा वर्षाचा असतानाच त्याने लिंब गावात वैद्यकीय प्रॅक्टीस करणारे व सध्या रयतचे अध्यक्ष असलेले डॉ. अनिल पाटील यांच्या दवाखान्यतून टी.व्ही. व अन्य साहित्य चोरले. डॉ. अनिल पाटलांनी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द रीतसर तक्रार देखील केली. परंतु त्यावेळचे तत्कालीन पोलीस अधिकारी फत्तुलाल नायकवडी यांनी आपल्या घरण्याला शिक्षणाचा वारसा आहे. आपल्या कुटुंबाने हजारो विद्यार्थी घडवलेत. पोलीस केसमुळे या मुलाचे आयुष्य बरबाद होईल, आपण केस मागे घ्या, असे सांगितले. डॉ. पाटलांनी केस मागे घेतली. पोलिसांनी केलेल्या या पहिल्याच सहकार्यांमुळे अभिजीतचा विश्वास दुणावला. त्याने छोटय़ा-मोठय़ा चोऱयांची मालिकाच सुरू केली. त्यामुळे वडीलांनीही पाठीवर शाबासकीची थाप मारायला सुरूवात केली. बघता-बघता अभिजित पोलीस डायरीवरचा सराईत ‘नान्या’ म्हणून प्रसिध्द झाला.

तडीपार गुंड अभिजीत तुलसीदास पवार (वय-35 लिंब) याचा धारधार शस्त्राने कराड येथे खून झाला. ही घटना लिंब गावात समजताच अभिजीतचा ‘नान्या’ कसा झाला याचे एक एक किस्से पारावर रंगू लागले. अभिजितच्या लहाणपणापासून चोरीची सवय बघून आई मात्र खंगत चालली होती. परंतु मुलगा रोज नव-नवीन वस्तू घेवून घरात येत असल्याने व वडीलांनाही त्यांचे व्यसन भागवण्यासाठी पैसे देत असल्याचे वडीलांची शाबासकीची थापच नान्याचा आत्मविश्वास वाढवत होती.

जीवनात दुसऱयाच्या पैशावर आपले शौक पुरे करने हे त्याला चांगलेच जमू लागले. तरूणाईत पाय ठेवल्यावर त्याला आपलेही लग्न व्हावे, असे वाटू लागले. परंतु तोपर्यंत त्याच्या चोरीच्या चर्चा लिंब गावच्या वेशीबाहेर जावून पोहचल्या होत्या. म्हणून त्याला मुलगी दय़ायला कोणी तयार नव्हते.

चुकीला माफी नसतेच

सातारा उंब्रजमध्ये 2 तसेच सांगलीमध्येही चोरी, वाहनचोरी, लुटमार, दरोडा यासाठी 36 गुन्हे त्याच्यावर दाखल पडले. तासवडे येथील टोलनाक्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकदा तो दिसला व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डिसेंबरमध्ये तो नुकताच कारागृह सुटून बाहेर आला. शनिवारी त्याचा खून झाल्याने त्याचा हा क्लायमॅक्स अनेक गावकऱयांच्या नजरेसमोर आला. चुकीला माफी नसते, हेच पुन्हा एकदा ‘नान्याचा’ झालेल्या शेवटावरून पुन्हा एकदा दिसून आले.

Related posts: