|Thursday, August 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » दोन दिवसांत ‘जॉली एलएलबी 2’ची 30.51 कोटींची कमाई

दोन दिवसांत ‘जॉली एलएलबी 2’ची 30.51 कोटींची कमाई 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता अक्षय कुमारचा जॉली एलएलबी 2 या बहुचर्चित चित्रपटाने दोन दिवसात 30.51 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.20 रूपयांची कमाई केली तर शनिवारी या चित्रपटाने 17.31 कोटींची कमाई केली आहे.

सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉलि एलएलबी 2’ शुक्रवारी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2013 मधील ‘जॉली एलएलबी’चा सिक्वेल आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह अन्नू कपूर, हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्लाही प्रमुख भूमिकेत आहेत. सर्वाधिक ओपनिंग मिळालेला ‘जॉली एलएलबी 2’ यंदाच्या वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे. मात्र ‘जॉलि एलएलबी 2’ला शाहरूख खानच्या ‘रईस’चा विक्रम मोडत आलेला नाही.