|Monday, April 22, 2019
You are here: Home » विविधा » संजय लोंढेंची ‘शांताबाई’, प्रचाराच्या मैदानात !

संजय लोंढेंची ‘शांताबाई’, प्रचाराच्या मैदानात ! 

ऑनलाईन टीम / पुणे :

निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या शकला लढवत असतात. अशीच एक अनोखी शक्कल लढवली ती राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ‘शांताबाई फेम’ संजय लोंढे यांनी नवी गाणी तयार केली. आता ही गाणी वाजवून उमेदवार मतांचा जोगवा मागत फिरत आहेत.

संगीतकार संजय लोंढे यांच्या ‘शांताबाई’ या गाण्याने सर्वांच्या घराघरात प्रवेश मिळवला. या गाण्याला इतकी प्रसिद्ध मिळाली की सध्या या गाण्यासारखीच नवी गाणी निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया गदादे-पाटील, प्रेमराज गदादे आणि अर्चना हनमघर हे प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात मतं मागण्यासाठी संजय लोंढे यांची गाणी चांगलीच गाजत आहेत. उमेदवारांचा मत मागण्यासाठीचा हा फंडा मतांसाठी कामी येतो का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Related posts: