|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » देशातील 10 लाख बँक कर्मचारी 28 फेब्रुवारीला जाणार संपावर

देशातील 10 लाख बँक कर्मचारी 28 फेब्रुवारीला जाणार संपावर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशातील विविध बँकेतील जवळपास 10 लाख कर्मचारी, अधिकारी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 28 फेब्रुवारीला एक दिवसीय संपावर जाणार आहेत. दिल्ली येथे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कामगार कायद्यात होणारे बदल, बँकांसमोरील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी याचबरोबर नोटाबंदीच्या काळातील मोबदला देण्याबाबत आदी विविध मागण्यांसाठी बँक युनियन्सकडून संप पुकारण्यात आला आहे. 28 फेब्रुवारीला होणाऱया या संपामध्ये देशातील नऊ बँक युनियन या राष्ट्रव्यापी संपात सहभागी होणार आहेत.