|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » कितीही आघाडय़ा करा, पण तुमचे पाप धुतले जाणार नाही : पंतप्रधान

कितीही आघाडय़ा करा, पण तुमचे पाप धुतले जाणार नाही : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / लखनौ :

तुम्ही कितीही आघाडय़ा करा पण तुमचे पाप धुतले जाणार नाहीत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला. आम्ही सत्तेवर आल्यास सहा महिन्यांमध्ये गुंडांना तुरुंगात पाठवू, असे आश्वासनही पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशमधील जनतेला दिले.

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या भागातील प्रचारसभेत पंतप्रधान बोलत होते. या भागात येत्या 15 फेब्रुवारीला मतदान होणार असून या भागातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या प्रचारसभेत सत्ताधारी समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पक्षावर पंतप्रधानांनी टीका केली. ते म्हणाले, 2022 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होतील. या काळात आपण देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेले पाहिजे. उत्तरप्रदेशने अनेक दशकांपासून समाजवादी आणि बसपाचे सरकार बघितले. पण त्यांचे सरकार राज्याचा विकास करु शकले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.