|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताक उपांत्य फेरीत

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताक उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था / प्राग्वे

झेक प्रजासत्ताकने फेडरेशन चषक महिलांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. झेकच्या विजयामध्ये प्लिसकोव्हा आणि स्ट्रायकोव्हा यांचा वाटा मोलाचा ठरला.

पहिल्या एकेरी सामन्यात झेकच्या तृतीय मानांकित प्लिसकोव्हाने स्पेनच्या सातव्या मानांकित मुगुरूझाचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये तासभराच्या कालावधीत फडशा पाडला. त्यानंतर झेकच्या स्ट्रायकोव्हाने दोन तासाच्या लढतीत स्पेनच्या अरूआबॅरेनाचा 6-4, 6-4 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर स्पेनच्या मुगुरूझाने झेकच्या स्ट्रायकोव्हावर 6-0, 3-6, 6-1 अशी मात करत झेकची आघाडी थोडी कमी केली. प्लिसकोव्हाने अरूआबॅरेनाचा 6-4, 7-5 असा पराभव करत झेकची आघाडी वाढविली. आता झेक प्रजासत्ताक आणि अमेरिका यांच्यात 22-23 एप्रिलला उपांत्य फेरीची लढत होणार आहे.