|Sunday, July 15, 2018
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे भारतात आगमन

ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे भारतात आगमन 

वृत्तसंस्था/ मुंबई

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ 4 सामन्यांच्या बोर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेसाठी सोमवारी भारतात दाखल झाला आहे. या मालिकेतील पहिली कसोटी दि. 23 फेब्रुवारीपासून पुणे येथे खेळवली जाईल.

ऑस्ट्रेलियन संघ दुबईतील प्रशिक्षण शिबीर आटोपल्यानंतर मुंबईत दाखल झाला आणि लगोलग त्यांनी दक्षिण मुंबईतील अलिशान हॉटेलकडे प्रस्थान केले. येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारत अ संघाविरुद्ध एकमेव सराव सामना खेळल्यानंतर पुढे ते पुण्याकडे रवाना होतील. या मालिकेसाठी उद्या (दि. 15) त्यांचे पहिले सराव सत्र होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ 2012-13 हंगामानंतर पूर्ण कसोटी मालिकेसाठी प्रथमच भारत दौऱयावर आला असून 2012-13 च्या मालिकेत त्यांचा भारताने 4-0 असा सफाया केला होता. नंतर 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-0 असा फडशा पाडत हिशेब चुकता केला. आता दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरत असून उभय संघांत बरीच चुरस, जोरदार जुगलबंदी अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, शॉन मार्श, पीटर हँडस्कॉम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), स्टीव्ह ओकिफे, मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हॅझलवूड, ऍस्टन ऍगर, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेप्सन, ग्लेन मॅक्सवेल.

कसोटी मालिकेची रुपरेषा

तारीख/ लढत / ठिकाण

दि. 17 ते 19 फेब्रु./ भारत अ वि. सराव सामना/ मुंबई

दि. 23 ते 27 फेब्रु./ पहिली कसोटी/ पुणे

दि. 4 ते 8 मार्च/ दुसरी कसोटी / बेंगळूर

दि. 16 ते 20 मार्च / तिसरी कसोटी / रांची

दि. 25 ते 29 मार्च / चौथी कसोटी / धरमशाला

Related posts: