|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पै-पाहुण्यांच्या राजकारणाला फाटा द्या – ना.सदाभाऊ खोत

पै-पाहुण्यांच्या राजकारणाला फाटा द्या – ना.सदाभाऊ खोत 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

राष्ट्रवादीच्या नेत्याला पै-पाहुणे मोठे करण्यात रस आहे. या प्रवृत्तीला फाटा देवून रयतेचे राज्य प्रस्तापित करा, असे आवाहन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कापूसखेड येथे झालेल्या रयत विकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत केले.

पेठ जि.प व पं.स.उमेदवारच्या प्रचारार्थ कापूसखेड येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव नाईक होते. तसेच वनश्री नानासाहेब महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री खोत पुढे म्हणाले, आम्हाला राजकारणात कुणाचाही वारसा किंवा कुणाची लाचारी पतकरुन मंत्रीपद मिळालेले नाही. आम्हा शेतकऱयांच्या व कष्टकऱयांच्या आंदोलनातून त्यांची कामेकरुन राजकारणात आलो. पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा ही पद्धत मोडीत काढा. ज्यांनी सहकारी संस्थेत भ्रष्टाचार केला आहे. त्यांची चौकशी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

आ.शिवाजीराव नाईक म्हणाले, शिराळयाच्या डेंगरातून भ्रष्ट आघाडीला सुरुंग लावला आहे. आत्ता वाळवा तालुक्यातील सूज्ञ मतदारांनी इथही राष्ट्रवादीला सुरुंग लावावा, असे आवाहन त्यांनी केले. वनश्री नानासाहेब महाडीक म्हणाले, आम्ही काम करताना कोणलाही वशीला लावत नाही. आम्हच व्यासपीठ खुल आहे. खासदार, आमदार आणि मंत्री आपल्या विचाराचे आहेत. त्यामुळे कोणी विकासाच्या गप्पा मारत असले, तरी त्यांच्या भुलथापांना बळी पडूनका.

यावेळी युवानेते सम्राट महाडीक, पं.स.सदस्य प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, सौ.अलका पाटील, अशोक पाटील, ऍड.पोपटराव पवार, रविंद्र पाटील, गणेश पाटील, पै.शिवाजी हुबाले, सचिन जाधव, गणेश खराडे, रविंद्र बल्लाळ, रोहन धुमाळे, अरुण कांबळे, अरविंद पाटील, संजय पिस्तुले, जलिंदर हुबाले, रामचंद्र अनुसे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.