|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अंगणवाडीसेविका मानधन ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे

अंगणवाडीसेविका मानधन ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे 

कणकवली : अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांचे मानधन केंद्र शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे आयुक्तालयामार्फत अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे मानधन अंगणवाडी कर्मचाऱयांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्तालयाने विकसीत केलेल्या संगणक प्रणालीत राज्यातील सर्व सेविका, मदतनीस यांची नावे बँक खाते, आधारकार्ड क्रमांक, आहरण व सवितरण अधिकारी यांची माहिती अपलोड करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल 2017 मानधन प्रायोगिक तत्वावर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.