|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » देशभरातील 34 सीएंची होणार चौकशी

देशभरातील 34 सीएंची होणार चौकशी 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

नोटाबंदीच्या काळात अर्थिक घोटाळय़ात समावेश असलेल्या चार्टर्ड आकाऊंटंट्समागे आता चौकशीचा फेरा लागणार आहे. केंद्र सरकारने इन्सिटटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाला (आयसीएआय) देशभरातील 34 सीएंची यादी दिली आहे. या सर्वांचे आता चौकशी केली जाणार असून लवकरच सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

गेल्या आठवडय़ात केंद्र सरकारने केलेल्या तपासात नोटाब्ंादीच्या काळात 559 जणांनी सुमारे, 3,900 कोटी रूपयांच्या अर्थिक गैरव्यवहार केल्याचे समोर आले होते. यामध्ये 54 तज्ञांनी त्यांना मदत केली होती. या सर्वांची नावे विविध तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारने आयसीएआयला 34 सीएंची यादी सोपवली आहे. आयसीआयने या यादीतील नावे तपासायला सुरूवात केली असून या सर्वांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना शिस्तपालन समितीसमोर नेले जाईल असे आयसीएआयचे पदाधिकाऱयांनी सांगितले.

Related posts: