|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » पॅनकार्ड मिळणार तत्काळ

पॅनकार्ड मिळणार तत्काळ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नागरिकांना नवीन पॅनकार्ड देण्याची प्रक्रिया सरकारकडून सुलभ करण्यात येत आहे. यासाठी सरकार लवकरच नवीन सेवा सुरू करणार आहे, ज्यामुळे केवळ काही मिनिटामध्ये पर्मनंट अकाऊंट नंबर पॅन प्राप्त करता येईल. याचप्रमाणे स्मार्टफोनच्या सहाय्याने प्राप्तिकरही भरता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाने आधार ई-केवायसी सुविधेचा वापर करत रिअल टाईमच्या आधारे पॅन देण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ई-केवायसी संबंधित व्यक्तीच्या पत्ता आणि त्याची वैयक्तिक माहिती गोळा करता येणार आहे.

सध्या बाजारातून ज्या प्रमाणे सिमकार्ड खरेदी करता येते, त्याचप्रमाणे पॅनकार्ड देण्यात येणार आहे. हे पॅनकार्ड देण्यासाठी केवळ पाच ते सहा मिनिटे कालावधी लागेल. सध्या पॅनकार्ड मिळण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. या प्रक्रियेनुसार पॅन क्रमांक तत्काळ देण्यात येणार. मात्र हे कार्ड घरपोच पाठविण्यात येणार आहे.

ही सेवा देण्यासाठी प्रत्यक्ष कर महामंडळ आणि कंपनी व्यवहार मंत्रालय यांच्यात करार झाला आहे. यानुसार नवीन कंपन्यांसाठी लागणारे पॅनकार्ड संयुक्त अर्जाच्या मदतीने चार तासात जारी करण्यात येईल. कंपन्यांसाठी बिझनेस आयडेन्टिफिकेशन नंबरसाठी काम करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे.

मोबाईलवरून कर देण्यासाठी प्राप्तिकर विभाग नवीन ऍप तयार करत आहे. या ऍपमध्ये अर्ज, आपल्या रिटर्नचे अपडेट यासारखी माहिती देण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभाग वरिष्ठ नागरिकांबरोबर युवक करदात्यांसाठी प्रक्रिया सुलभ करत आहे. डायरेक्टोरेट ऑफ सिस्टमच्या देखरेखीखाली दोन्ही उपक्रमांवर काम सुरू आहे.

Related posts: