|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » साडवलीत शॉर्टसर्किटने घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान

साडवलीत शॉर्टसर्किटने घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान 

ताराबाई जाधव यांचे डोक्यावरील छप्परच हरपले

तातडीने मदतीची गरज

प्रतिनिधी /देवरूख

संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील ताराबाई हरिश्चंद्र जाधव (65) या वृध्देच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. सुर्दैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. ही घटना बुधवारी 15 फेबुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.

आग लागल्याची कुणकुण लागताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र आग आटोक्यात आणेपर्यंत आगीत भांडी, कपडे, धान्य, महत्वाची कागदपत्रे, कौले, कोने, वासे, रिपा तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. तसेच यात रोख रक्कम 45 हजार जळून गेली. या घटनेची खबर मिळताच मंडळ अधिकारी नीलेश पाटील, तलाठी बजरंग दत्तात्रय चव्हाण यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

आग प्रतिबंधक यंत्रणा असती तर…

आग आटोक्यात आणण्यासाठी संगमेश्वर तालुक्यात यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी लागलेल्या आगीत करोडोंची हानी होत आहे. वणव्यामुळे लागलेल्या आगीने तर तालुक्यात मोठी हानी झाली आहे. साडवलीच्या ताराबाई जाधव यांच्या घराला लागलेली आग जर आग प्रतिबंधक यंत्रणा असती तर आटोक्यात आली असती. संगमेश्वर तालुक्यात आगीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत असून आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्नीबंब तालुक्याच्या ठिकाणी असणे गरजेचे आहे. मात्र या बाबत मागणी करुनही संगमेश्वर तालुक्यात या यंत्रणेची पूर्तता अद्याप झाली नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी तीव्र नराजी व्यक्त केली आहे.

ताराबाईंना तातडीने मदतीची गरज

दरम्यान ताराबाई यांच्या घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्यांना राहण्यासाठी निवारा व झालेले नुकसान तातडीने देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात आगीच्या घटनांपासून होणारे मोठय़ा प्रमाणात नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून अग्निशामक यंत्रणा उपलब्ध करुन घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

Related posts: