|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘भूमी’तून संजय दत्त लवकरच परतणार

‘भूमी’तून संजय दत्त लवकरच परतणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त आपल्या आगामी सिनेमा ‘भूमी’तून कमबॅक करणार आहे. यासाठी तो आग्रा येथे दाखलही झाला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड इंडस्ट्रीमधून दूर असलेला संजय दत्त लवकरच नव्या सिनेम्यात दिसणार आहे.

bh

‘भूमी’ या सिनेमामध्ये संजय दत्तसोबत शेखर सुमनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या सिनेमामध्ये शेखर सुमन टुरिस्ट गाईडच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळत आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणासाठी संजय दत्त आग्रा येथे असल्याने त्याची येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्थाही करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर संजय दत्तच्या स्वागतासाठी हॉटेलमधील कर्मचाऱयांनी त्याचे जंगी स्वागत केले. त्यामुळे संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला ‘भूमी’ प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो हेच आता पाहावे लागणार आहे.