|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » बेळगावातही मराठयांचा झेंडा

बेळगावातही मराठयांचा झेंडा 

ऑनलाईन टीम / बेळगाव  :

मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या बेळगावातही मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा आज डौलाने फडकला. सीमाप्रश्न तसेच अन्य मागण्यांचा मूक हुंकारही या वेळी उमटल्याचे पाहायला मिळाले.  

कोपर्डी प्रकरणी दोषींना फाशी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी लाखो मराठे आज बेळगावनगरीत एकवटले आहेत.एक मराठा; लाख मराठा यांसह विविध घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला आहे. सीमावासीयांचा हा असीम,  अथांग महासागर ऐतिहासिकआणि क्रांतीकारक  ठरत आहे. तरुण, महिला यांचा सहभागही लक्षणीय आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवसैनिकही मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी झाले आहेत.त्यामुळे अवघे बेळगाव भगवे झाले  आहे. 

 

Related posts: