|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खऱया आनंदाचा शोध द्या!

खऱया आनंदाचा शोध द्या! 

सावंतवाडी : स्वतःकडे अंतर्मुख होऊन पहा. खरोखरच आनंद कशात आहे, याचा शोध घ्या. स्वतःच्या जीवनाबाबत किती गंभीर आहोत, हे ओळखून दिशा ठरवा, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी-गरड येथील भवानी मंदिरात जिल्हा गंथालय व कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ग्रंथालयातील कर्मचारी, संचालक यांच्यासाठी दोन दिवसीय व्यक्ती निर्माण संस्कार निवासी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. जोशी यांनी जीवन जगण्याची दिशा आणि व्यक्ती निर्माण यावर मार्गदर्शन केले. दिवसभरात त्यांनी विविध कलाकुसरच्या माध्यमातून आनंदी जीवनाची दिशा दाखवून दिली.

यावेळी जिल्हा ग्रंथालयाचे श्रेया गोखले, कैलास कुरकुट्टे, कलंबिस्त वाचनालयाचे अध्यक्ष रुपा सावंत, सचिव संतोष सावंत, राजन खोत, प्रभाकर गावकर, पूनम नाईक, श्री. पटेल आदी तालुक्यातील ग्रंथालयांचे संचालक, ग्रंथपाल उपस्थित होते. यावेळी कैलास कुरकुट्टे यांनी व्यक्ती निर्माण आणि सुसंस्कार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हय़ात प्रत्येक पंचक्रोशीनिहाय व्यक्ती निर्माण व संस्कार शिबिरे घेण्याच्यादृष्टीने जोशी यांनी ग्रंथालय कर्मचाऱयांना मार्गदर्शन केले. दिवसभरात खेळ, योगा, करमणुकीचे कार्यक्रम करण्यात आले.