|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संस्थांना कमोडिटी प्रकारात ट्रेडिंग करता येणार

संस्थांना कमोडिटी प्रकारात ट्रेडिंग करता येणार 

वृत्तसंस्था/ मुंबई

संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारीतय कमोडिटी फ्यूचरमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी लवकरच परवानगी देण्यात येईल. या संदर्भात एका महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे सेबीचे प्रुमख यु. के. सिन्हा यांनी म्हटले. सध्या भारतीय कमोडिटी बाजारात दरवर्षी 67 लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. भारतीय बाजारात अधिक उलाढाल करण्यात यावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

भारतात 2003 पासून कमोडिटी प्रकारात फ्युचर ट्रेडिंग करण्यात येत आहे. मात्र यापासून विदेशी गुंतवणूकदार, बँका, म्युच्युअल फंड आणि अन्य संस्थाना दूर ठेवण्यात आले होते. संस्थात्मक गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे आणि स्पॉट आणि फ्युचर बाजारात उतरण्याची संधी मिळणार आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय भांडवली बाजाराचा विस्तार होणे कठीण आहे, असे सेबीचे प्रमुख सिन्हा यांनी म्हटले.

म्युच्युअल फंडांना कमोडिटी फ्युचर बाजारात व्यवहार करण्याची प्रथम संधी देण्यात येईल. याची सुरुवात होण्यासाठी किमान एक महिना अपेक्षित आहे. कमोडिटी प्रकारात बँकांना खूप संधी आहे. कारण त्या हेजिंग या प्रकाराचा अवलंब करतात. कमोडिटी फ्युचर मार्केटमध्ये बँकांना टेडिंगसाठी परवानगी देण्यासाठी आरबीआयबरोबर सेबीची चर्चा सुरू आहे असे त्यांनी म्हटले. संस्थात्मक गुंतवणूकदारांना कमोडिटी फ्युचर प्रकारात उतरण्यासाठी सेबी प्रयत्नशील आहे. मात्र बँका आणि विदेशी गुंतवणूकदारांना परवानगी देण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या सहमतीची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील अनेक तज्ञांनी सेबीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.