|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जमखंडी क्रांती मोर्चास वाढता पाठिंबा

जमखंडी क्रांती मोर्चास वाढता पाठिंबा 

अथणी, ऐनापूर, उगार, शेडबाळ, मंगसुळी भागातील बांधव होणार सहभागी

वार्ताहर / जमखंडी

   जमखंडीत सोमवार दि. 27 रोजी होणाऱया मराठा क्रांती (मूक) मोर्चास पाठिंबा वाढत असून अथणी, ऐनापूर, उगार, शेडबाळ, मंगसुळी या भागातून मराठा बांधव भाग घेणार आहेत. जमखंडीत बागलकोट जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असले तरी बेळगाव जिल्हय़ातील अनेक गावांचा जवळचा संपर्क असून क्रांती मोर्चाच्या प्रचारास गेलेल्या गटाला या गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मंगसुळी येथील प्रशांत पाटील, राजू पाटील, शेडबाळचे गणेश कदम, रमेश शिंदे, उगारचे निंबाळकर, प्रफुल तोरुचे, उगार बुद्रुकचे दिलीप काटकर, विकास जाधव, ऐनापूरचे ऍड. प्रकाश माने, उदय माने, शिनाळचे केशव पाटील, अरुण पाटील, अथणीचे अप्पासाहेब चव्हाण, ऍड. देसाई, मोरे, सुटट्टीचे मगर, पाटणकर आदींनी आपापल्या गावात छोटय़ा बैठका घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. प्रचार गटात राकेश लाड, ए. आर. शिंदे, सुनील भोसले, श्रीकांत मुधोळे, रायबा जाधव, जोतिबा केशव शिंदे, अजित मेंगाणे, मोहन सावंत, ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदींचा समावेश होता.