|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामींसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान

तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामींसमोर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

तामिळनाडू विधानसभेमध्ये नवनर्वाचित मुख्यमंत्री पलानीस्वमी यांच्या दृष्टीने शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाच आहे. पलानीस्वामी यांच्या पुढय़ात बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे.मात्र मुख्यमंत्रीपदावरून नुकतेच पायउतार झालेले पन्नीरसेल्वम त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात. शशिकला तुरूंगात गेल्यामुळे पलानीस्वामी आणि पन्नीसेल्वम यांच्यात सत्तासंघर्ष रंगणार आहे.

तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्याच्या आवघ्या एक दिवस आधी पलानीस्वामी गटाला मोठा धक्का बसला. आमदार आणि राज्याचे माजी पोलिस महासंचालक नटराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा दिला आहे. नटराज यांच्या पावित्र्यानंतर 234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामींच्या कथित समर्थक आमदारांची संख्या घटून 123 वर गेली आहे.

तामिळनाडू विधानसभेत एआयएडीएमकेचे 134 आमदार आहेत. बहुमत सद्धि करण्यासाठी 118 आमदारांचा पाठींबा आवश्यक आहे. आर नटराज यांनी विरोधात जाण्याची भूमिका घेतल्यानंतरही पलानीस्वामींना आपल्याकडे 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे पलानीस्वामींनी आपल्याकडे बहुमतपेक्षा 5 आमदार जास्त असल्याचा दावा केला आहे.