|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्व बॅडमिंटन मानांकनात सिंधू पाचव्या स्थानी

विश्व बॅडमिंटन मानांकनात सिंधू पाचव्या स्थानी 

सिंधूचे कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी, सायना नेहवाल नवव्या स्थानी कायम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची पीव्ही सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारी दुसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. शनिवारी जाहीर केलेल्या ताज्या बॅडमिंटन क्रमवारीत सिंधू पाचव्या स्थानी आहे. तसेच सायना नेहवालनेही आपले नववे स्थान कायम राखले आहे.

गत महिन्यात सय्यद मोदी स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱया सिंधूचे हे कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे मानांकन पटकावले आहे. क्रमवारीत सर्वोत्तम मानांकन मिळवणारी ती दुसरी भारतीय खेळाडू आहे. हैदराबादच्या या 21 वर्षीय खेळाडूच्या नावावर 69.399 मानांकन गुणाची नोंद आहे. या व्यतिरिक्त सायना नेहवाल टॉप-10 मध्ये असलेली दुसरी भारतीय खेळाडू आहे. ताज्या क्रमवारीत सायना नवव्या स्थानी आहे.

पुरुष गटात भारताचा स्टार खेळाडू अजय जयराम 18 व्या स्थानी आहे. तसेच किदांम्बी श्रीकांत व एचएस प्रणय अनुक्रमे 21 व्या व 23 व्या स्थानी विराजमान आहेत. पुरुष दुहेरीतील क्रमवारीत मनु अत्री-बी सुमित रेड्डी जोडी 24 व्य़ा तर एन सिक्की रेडी्-प्रणव जेरी चोप्रा 14 व्या स्थानी कायम आहेत.