|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमच्या आठ जणांना अटकपूर्व जामीन

हेस्कॉमच्या आठ जणांना अटकपूर्व जामीन 

प्रतिनिधी / बेळगाव

टी. बी. मजगी यांनी हेस्कॉममधील दहा जणांवर गुन्हा नोंदविला होता. यामधील आठ जणांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दोघांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.

हेस्कॉममधील नाथाजी पिराजी पाटील, सुभाष हुल्लोळी, मल्लिकार्जुन रेडीहाळ, राजू हळंगळी, गोडल कुंदरगी, सर्जू शहापूरकर, पुजारी, पत्तार, कांबळे यांच्यासह सिंधू या दहा जणांवर माळमारुती पोलीस स्थानकात टी. बी. मजगी यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी या सर्वांवर वेगवेगळे गुन्हे नोंदविले होते. त्यानंतर या सर्वांनी अकराव्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. यामधील आठ जणांना जामीन अर्ज मिळाला आहे. तर सर्जु शहापूरकर आणि सिंधू यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. नाथाजी पाटील यांच्यावतीने ऍड. सुभाष पट्टणशेट्टी यांनी काम पाहिले.   

Related posts: