|Thursday, February 21, 2019
You are here: Home » Automobiles » होंडाची नवी ‘सिटी’ कार लाँच

होंडाची नवी ‘सिटी’ कार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

होंडाने आपली ‘सिटी’ ही कार नव्या स्वरूपात बाजारात आणली आहे. पेट्रोल आणि डिझेल या देन्ही व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. या कारची किंमत 8 लाख 49हजार 999रूपयांपासून 13 लाख 56 हजार 990 रूपयांपर्यंत असणार आहे.

हेंडाने ही कार आज लाँच केली आहे. तसेच या कारची प्री-बुकींगही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे 21,000 रूपयात ही कार तुम्ही बुक करू शकता. होंडाने या कारमध्ये बरेच बदल केले आहेत. या कारचा पक्त बाहेरूनच लूक बदलला नाही तर आतही बदल करण्यात आले आहेत. या कारच्या डिझेल व्हर्जनची किंमत 10 लाख 76 हजार ते 13 लाख 57 हजार असणार आहे. पेट्रोल व्हर्जन कारची किंमत 8 लाखांपासून ते 13 लाख 53 हजारांपर्यंत असणार आहे. या कारची सियाज, वेरना, वेंटा आणि स्कोडा यांच्याशी स्पर्धा असणार आहे.

Related posts: