|Friday, July 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » नव्या व्यक्तिरेखेमुळे रहस्यमय घटनांची लागणार ‘चाहूल’

नव्या व्यक्तिरेखेमुळे रहस्यमय घटनांची लागणार ‘चाहूल’ 

कलर्स मराठीवरील ‘चाहूल’ मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या लग्नाबद्दल सगळय़ांना बरीच उत्सुकता होती. परंतु, लग्नाच्या दिवशीच जेनी बरोबर घडलेल्या घटना आणि तिच्या जीवाला असलेला धोका खरा ठरला आणि तिचा आकस्मिक मफत्यू झाला. पण हे सगळे कोण करत आहे? या मागे कोणाचा हात आहे? हे सगळं निर्मलाच करत आहे की कोणा दुसऱयाचा यामागे हात आहे हे अजून उघडकीस आलेलं नाही. लग्नाच्याच दिवशी जेनीच्या अचानक मफत्यूने वाडय़ामध्ये सगळय़ांनाच धक्का बसला. पण, आता वाडय़ामध्ये कुणाची तरी चाहूल लागली आहे. चाहूल मालिकेमध्ये शांभवीची एन्ट्री झाली आहे. ही शांभवी कोण आहे? हिच्या येण्याने नक्की वाडय़ामध्ये काय होणार आहे? प्रेक्षकांना पडलेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. शांभवी हे पात्र रेश्मा शिंदे ही अभिनेत्री साकारणार आहे.

महादेव यांच्या मदतीने शांभवी वाडय़ामध्ये येणार आहे. शांभवी ही अतिशय निरागस आणि मनमिळाऊ मुलगी आहे. लहानपणापासून तिला एक दैवी देणगी आहे आणि त्याचाच फायदा वाडय़ातील अनेक रहस्य सोडविण्यासाठी शांभवीला होणार आहे. शांभवीला अमानवी शक्ती, आत्मा आणि अघटीत गोष्टींची चाहूल लागते. तिला तिच्या जवळपास असलेल्या या सगळय़ा गोष्टी समजतात. वाडय़ातील अमानवी, अघटीत गोष्टींचं रहस्य समोर आणण्यासाठी शांभवी वाडय़ामध्ये आली आहे. भूतकाळ, जेनीच्या मफत्यूचे रहस्य आणि निर्मलाच्या आत्म्याचे गूढ शांभवी उघडकीस आणणार आहे. तसेच सर्जेराव आणि शांभवी या दोघांमध्ये मैत्री होणार का? त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये होणार की नाही? जेनीच्या मफत्यूचे रहस्य आणि निर्मलाच्या आत्म्याचे गूढ उघडकीस आणण्यास निर्मलाची साथ शांभवीला लाभणार की निर्मला अडथळे निर्माण करणार हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ‘चाहूल’ या मालिकेत नव्या घटनांची चाहूल लागणार आहे.