|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान रूळाला तडे गेल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.

आज सकाळी 8 :30 च्या सुमारास कल्याण – विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान अप मार्गावर रेल्वे रूळाला तडा गेला. परिणामी गाडय़ा 15-20 मिनिट उशिराने धावत आहेत. रूळामधील बिघाड दुरूस्त होण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पिक अवरला मुंबईकडे येणाऱया प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.