|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » टीसीएसकडून बायबॅकची घोषणा

टीसीएसकडून बायबॅकची घोषणा 

नवी दिल्ली

 बाजारमूल्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी टीसीएसने सोमवारी समभाग पुनर्खरेदीच्या शेअर बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिली. कंपनी 2,850 रुपये प्रतिसमभाग या दराने 16 हजार कोटी रुपयांचे समभाग पुन्हा खरेदी करणार आहे. कंपनीकडून ही घोषणा करताच समभागात 5 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून आली. कंपनीचे बाजारमूल्य साधारण 19 हजार कोटी रुपयांनी वधारले. संचालक बैठकीत टीसीएसने 5.6 कोटी समभागांची पुन्हा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 2,850 रुपये प्रतिसमभाग या दराने खरेदी करण्यात येणार आहे. बायबॅक प्रक्रिया, वेळ आणि अन्य माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कंपनीचा समभाग 2,506 पर्यंत पोहोचत 3 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. समभाग पुनर्खरेदीसाठी गुंतवणूकदारांकडून गेल्या काही दिवसांत दबाव टाकण्यात येत होता. कंपनीजवळ साधारण 40 हजार कोटी रुपयांचे रोख आहे. या रोकडीचा कशा प्रकारे वापर करण्यात येणार आहे, असा प्रश्न गुंतवणूकदारांकडून विचारण्यात येत होता. टीसीएसने बायबॅकची घोषणा करताच अन्य कंपन्यांनीही समभाग पुनर्खरेदी करावी ही मागणी वाढण्याची शक्यता आहे.