|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एनएसजी कमांडोला रोबोटची साथ

एनएसजी कमांडोला रोबोटची साथ 

3डी रडार देखील दलाला सुपूर्द : दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये वापर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दहशतवादविरोधी दल नॅशनल सिक्युरिटी गार्ड्सचे (एनएसजी) कमांडो आता डोगो रोबोट, 3डी रडार आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवादी हल्ले हाणून पाडतील. दहशतवादी हल्ल्यांचे बदलते स्वरुप पाहता एनएसजीला अत्याधुनिक शस्त्रास्त्रs आणि गॅजेट्स उपलब्ध करविण्यात आले आहेत. स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स (स्वॅट) पथकाला याशिवाय इस्रायल, अमेरिका आणि इटली निर्मित स्नायपर रायफल आणि पिस्टोलने सज्ज करण्यात आले आहे.

पठाणकोट आणि 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांपासून धडा घेत एनएसजीला सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रs उपलब्ध करविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ब्लॅक कॅट्स कमांडोंना जर्मनीकडून निर्मित पीएसजी-1 ए1 स्नायपर रायफल देण्यात आली आहे. ही रायफल पीएसजी-1 ची सुधारित आवृत्ती आहे.

दूर्बीणीने युक्त या रायफलमध्ये एकाचवळी 20 राउंड काडतूस लोड करता येतात. एनएसजीला म्यूनिशन लाँचर सिस्टीम नावाचा ड्रोन देखील देण्यात आला आहे. पांढऱया रंगाचा हा ड्रोन 38 एमएमचे 2 ग्रेनेड वाहून नेण्यास सक्षम आहे. रिमोट कंट्रोलद्वारे मोठय़ा अंतरावरून संचालित होणाऱया या ड्रोनमध्ये गुप्त कॅमेरे असून याद्वारे शत्रूला ध्वस्त करण्याबरोबरच त्याविषयी पूर्ण माहिती देखील प्राप्त केली जाऊ शकते.

डोगो रोबोट

एनएसजीच्या पथकात सर्वात धोकादायक आणि अत्याधुनिक उपकरण इस्रायल निर्मित डोगो रोबोट आहे. साडेअकरा किलो वजनी हा रोबोट दहशतवाद्यांच्या तळात शिरून कमांडोंना कॅमेरा फीडद्वारे त्यांच्या स्थितीविषयी अचूक माहिती देण्यास सक्षम आहे. एवढेच नाही तर डोगो अत्याधुनिक ग्लोक पिस्तुलने देखील युक्त असेल. त्याचबरोबर हा रोबोट एनक्रिप्टेड (गुप्त भाषा) ऑडिओद्वारे संदेश देखील पाठवू शकणार आहे. अँटी हायजॅकिंग मोहिमेत वापर होणाऱया एका रोबोटची किंमत 76 लाख रुपये आहे. याचे नाव अर्जेंटाइन मॅस्टिफ नावाच्या शिकारी कुत्र्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

3 डी रडार

एनएसजीकडे आता 2डी ऐवजी 3डी रडार असेल. हा 20 मीटर रुंद भिंतीपलिकडची माहिती देण्यास सक्षम आहे. 14 किलोग्रॅम वजनी या रडारची किंमत जवळपास 1 कोटी रुपये आहे. याशिवाय ब्लॅक कॅट्स कमांडोंना अत्याधुनिक इटालियन रायफल देखील पुरविण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने गेट तोडणे सुलभ होईल.