|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » क्रिडा » माजी फुटबॉलपटू बॅनर्जी कालवश

माजी फुटबॉलपटू बॅनर्जी कालवश 

वृत्तसंस्था/ कोलकाता

मोहन बागानचे माजी फुटबॉल गोलरक्षक शिबाजी बॅनर्जी यांचे सोमवारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. बॅनर्जी यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 11 वर्षे मोहन बागानचे प्रतिनिधीत्व केले होते.

1977 साली मोहन बागान आणि न्यूयार्क कॉसमॉस यांच्यात झालेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात ब्राझीलचे फुटबॉलसम्राट पेले यांनी फ्री कीकवर मारलेला अचूक फटका गोलरक्षक बॅनर्जी यांनी थोपविला होता. 1977 ते 1980 कालावधीत मोहन बागान संघाकडून गोलरक्षण करताना अव्वल प्रतिस्पर्धी इस्ट बंगालकडून एकही गोल आपल्या संघावर नोंदविण्याची संधी दिली नाही. मोहन बागान तसेच कोलकात्यातील विविध फुटबॉल संघांकडून बॅनर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related posts: