|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते – भीमराव धुळूबुळू

पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते – भीमराव धुळूबुळू 

प्रतिनिधी / चंदगड

साहित्य हे त्या त्या काळाचं भान टिपणारं रूप आहे. भारूड, सुनीत, गझल, मुक्त छंद, कविता यातून भाव व्यक्त होत असतो. सतत डोळे उघडे ठेवून काव्यलेखन करायला हवे. गझलची बाराखडी समजून घ्यायला हवी. कवी सजगतेचे भान टिपतो. अनुभव कवितेत पकडता आला पाहिजे. पात्राच्या मनातले भाव टिपता आले तर कविता सापडते. झपाटून वाचनासाठी वेडे व्हा, प्रतिभा समजून घ्या.- असे प्रतिपादन दमसाचे उपाध्यक्ष कवी भीमराव धुळूबुळू यांनी केले.

हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित ‘सर्जनशील नवलेखक’ कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पी. वाय. निंबाळकर होते.

स्वागत प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. साहित्यिक प्रा. मोहन पाटील म्हणाले, साहित्याच अनुभव कथन महत्वाच. पात्र रूपातली माणसं वाचा. सृजनातून सर्जनाकडे जाणारं साहित्य अक्षर साहित्य होय. रंग, रस, स्पर्श, ज्ञान यातून सर्जनता घडते. श्रवणशक्ती ही श्रवणसंस्कृती बनावी. चिन्हाची भाषा येते आहे. सामाजिक दस्तऐवजच इतिहास निर्माण करतो. लेखक प्रामाणिक असावा लागतो.

कवी महेश कराडकर म्हणाले, स्वतःला प्रश्न करीत चला. आपल्याकडील गुणांची दखल घ्यायला हवी. भोवतालचा निसर्ग बघा. संवेदनशीलता ही जगण्याची महत्वाची बाजू होय. लेखकाला वर्तमानाशी जुळवून घेता यायला हवे. प्रयत्न हा मुळापासून असावा. संवेदनशीलता आणि श्रवणशक्ती माणसाला घडवते. माणसाकडे छंद असावेत. स्वतःचे अस्तित्व सिध्द करा. आवडीचं क्षेत्र निवडा. माणूस म्हणून घडा. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर म्हणाले, साहित्याची गोडी लागावी म्हणून अशा कार्यशाळा उपयुक्त असतात. दमसाने कार्यशाळा देऊन सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन रेखा सुतार यांनी केले. आभार प्रमोद चांदेकर यांनी मानले.

 

Related posts: