|Sunday, February 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 31 मार्चपासून जिओचा फ्रि डेटा बंद

31 मार्चपासून जिओचा फ्रि डेटा बंद 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या काहीदिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओने मोफत पुरवल्यामुळे जिओला चांगला प्रतिसाद मिळाला. देशभरात 31 जिओला रोमिंग फ्री असेल तरी डेटासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र जिओsचा डेटा इतर कंपन्यांच्या तुलनेत 20 टक्के स्वस्त असणार आहे.

31 मार्चनंतर जिओचा 303 रूपये प्रतिमहिना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओने गेल्या सह महिन्यात 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पाही ओलांडला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी फायनान्शिल सर्व्हिसेस अँड रिसर्च फर्म क्रेडिट स्विस एक्विटी रिसर्च यांनी वेगवेगळय़ा शहरांत डेटा नेटवर्क साठी केलेल्या सर्वेक्षणात रिलायन्स जिओचे नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचे समोर आले होते.

Related posts: