|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मॅजेस्टीकच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मॅजेस्टीकच्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

सावंतवाडीआदिनारायण मंगल कार्यालय, सालईवाडा-सावंतवाडी येथे मॅजेस्टिक बूक हाऊसने आयोजित केलेल्या मराठी व इंग्रजीमधील विविध विषयांवरील पुस्तकांचे मॅजेस्टिक पुस्तक प्रदर्शन, विक्रीस सावंतवाडी व आसपासच्या परिसरातील, रसिक वाचक, शाळा, महाविद्यालये व ग्रंथालये यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 स्वामी, मृत्युंजय, छावा आदी गाजलेल्या पुस्तकांबरोबर सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास, मन में है विश्वास, शिवाजी कोण होता? अशा पुस्तकांना मागणी मोठय़ा प्रमाणात होत आहे. धार्मिक, आध्यात्मिक, पाकशास्त्र, आरोग्य, ज्योतीष आदी विषयांवरील पुस्तके तसेच स्मार्ट फोन, कॅशलेस, कर्मबंधन, गर्भसंस्कार, मालवणी पदार्थ या पुस्तकांना वाचकांची विशेष पसंती आहे.

27 फेबुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन खुले आहे. रसिक वाचक, शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यांनी पुस्तके पाहण्याचा व खरेदीचा आनंद द्यावा, असे आवाहन मॅजेस्टिक बूक हाऊसच्या संयोजक माधुरी कोठावळे यांनी केले आहे.