|Monday, November 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तिसऱया विमानवाहू युद्धनौकेच्या निर्मितीच्या तयारीत चीन

तिसऱया विमानवाहू युद्धनौकेच्या निर्मितीच्या तयारीत चीन 

बीजिंगः  

समुद्रात आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी चीन एकामागोमाग एक विमानवाहू युद्धनौकांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीजिंगने मागील वर्षी आपल्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचा नौदलात समावेश केला होता. आता तो अमेरिकन मॉडेलवर आधारित आपल्या तिसऱया विमानवाहू युद्धनौकची निर्मिती करत आहे. वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावर दावा मजबूत करण्याबरोबरच हिंदी महासागराच्या मोठय़ा हिस्स्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची चीनची मनीषा लपून राहिलेली नाही. 5 ते 6 विमानवाहू युद्धनौका निर्माण करण्याची चीनची योजना आहे. त्याची पहिली विमानवाहू युद्धनौका लिओनिंग सोव्हिएत काळाच्या मॉडेलवर आधारित आहे. याच मॉडेलची दुसरी विमानवाहू युद्धनौका देखील तयार केली जात आहे, जी 2020 पर्यंत तैनात होण्याची अपेक्षा आहे. ती पहिल्या युद्धनौकेच्या तुलनेत अधिक विकसित असेल. त्याची निर्मिती डेलियन बंदरात सुरू आहे.  तिसरी विमानवाहू युद्धनौका टाइफ 002 लिओनिंग आणि दुसरी युद्धनौका 001 ए पासून एकदम वेगळी असेल. ती अमेरिकेच्या युद्धनौकेप्रमाणे दिसेल.

Related posts: