|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » कोहलीने केला 100 कोटींचा ‘विराट’ करार

कोहलीने केला 100 कोटींचा ‘विराट’ करार 

 प्युमा या आंतरराष्ट्रीय कंपनीशी करारबद्ध, एकाच कंपनीशी मोठा करार करणारा विराट पहिलाच खेळाडू,

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही फटकेबाजी करत असून त्याने क्रीडा साहित्य तयार करणाऱया प्युमा या आंतरराष्ट्रीय कंपनीशी तब्बल 110 कोटींचा करार केला आहे. विशेष म्हणजे, 100 कोटींचा करार करणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू आहे. प्युमाने कोहलीसोबत आठ वर्षासाठी हा करार केला आहे. या करारासोबत विराट धावपटू युसेन बोल्ट, असाफा पॉवेल व फुटबॉलपटू थिएर हेन्री या जागतिक ब्रँड ऍम्बेसिडर यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

प्युमाने विराटसोबत केलेला करार आठ वर्षासाठी आहे. प्युमाने याआधीही अनेक दिग्गज क्रिकेटपटूंशी करार केले आहेत. अशा खेळाडूंच्या यादीत सामील होणे, ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया विराटने व्यक्त केली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी यांनी यांनी विविध एजन्सी व कंपन्यासोबत 100 कोटींचे करार केले आहेत. मात्र, विराटने एकाच कंपनीसोबत एवढय़ा मोठय़ा रकमेचा करार करुन विक्रम प्रस्थापित केला आहे. विराट कंपनीची सिग्नेचर लाईन लाँच करणार असून त्यासाठी विशेष लोगो वापरण्यात येणार आहे. या जाहिरातीसाठी वर्षाला तब्बल 12 ते 14 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

गतवर्षी कोहलीने ब्रॅन्हव्हॅल्युच्या माध्यमातून तब्बल 600 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे ‘डफ अँड फेल्प्स’ या खाजगी कंपनीने दिलेल्या आकडेवारीवरुन जाहीर होते. गत वर्षभरातील कोहलीच अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. आपल्या उत्पदनाचे ब्रॅन्डिंग कोहलीने करावे यासाठी देशभरातील अनेक नामांकित कंपन्या प्रयत्नशील आहेत. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रँन्डव्हॅल्यूमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले. सध्याच्या घडीला कोहली 20 पेक्षा अधिक ब्रँन्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर या कंपन्यांचा समावेश आहे