|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘अन्वेषणे 2017’ कला प्रदर्शनाचे उद्घाटन

‘अन्वेषणे 2017’ कला प्रदर्शनाचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध कलाकार संजय हरमलकर यांच्याहस्ते गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य एम. व्ही. वेंगुर्लेकर आणि महालसा कला शाळेच्या पेटिंग विभागाचे प्रमुख श्री. एन. एस. पटार यांच्या उपस्थितीत आल्तिनो- पणजी येथील गोवा कला महाविद्यालयाच्या कला दालनात मंगळूर येथील महालसा कला शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ‘अन्वेषणे 2017’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

महालसा कला शाळेच्या सुमारे एकोणिस विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात आपल्या चित्रकला सादर केल्या. सदर प्रदर्शन 24 फेबुवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकांसाठी खुले राहील. महालसा कला शाळा आणि गोवा कला महाविद्यालयासाठी हे प्रदर्शन म्हणजे देवाणघेवाणाचा कार्यक्रम आहे.