|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » …आणि मल्ल्या पैसे घेऊन पळून जातो : वरुण गांधी

…आणि मल्ल्या पैसे घेऊन पळून जातो : वरुण गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मागील दोन वर्षात देशात साडेसात हजार शेतकऱयांनी कर्जामुळे आत्महत्या केली. मात्र, दुसरीकडे विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वरुण गांधींनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला.

एका शाळेत आयोजित कार्यक्रमात वरुण गांधी बोलत होते. ते म्हणाले, देशातील जवळपास साडेसात हजार शेतकऱयांनी आत्महत्या केली असे असताना मात्र, दुसरीकडे विजय मल्ल्याने 9 हजार कोटी रुपये घेऊन देशातून पळ काढला. रोहित वेमुलाची सुसाइड नोट वाचल्यानंतर आपल्याला रडू कोसळले, असेही ते म्हणाले.

दरम्यान, वरुण गांधी यांच्या या वक्तव्यावरुन भाजपला नको असलेले मुद्दे पुन्हा उपस्थित केल्याने पक्षातील इतर नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.