|Monday, June 17, 2019
You are here: Home » Automobiles » BS-IV इंजिनची TVS Wego 2017 लाँच

BS-IV इंजिनची TVS Wego 2017 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएसने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी TVS BS-IV 2017 इंजिनची Wego नुकतीच लाँच केली आहे. या नव्या स्कूटरमध्ये अत्याधुनिक असे विशेष फिचर्स देण्यात आले आहेत.

असे असतील या नव्या स्कूटरचे फिचर्स –

– इंजिन – सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये 8 बीएचपीची पॉवर आणि 8 एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता असणार आहे.

TVs

– सीसी – 109.7cc चे 4 स्ट्रोक CVTi

– अन्य फिचर्स – सिंक ब्रेक सिस्टिम, टेलिस्कोपिक प्रंट शॉकऑब्जर, फुल डिजिटल स्पीडोमीटर, युएसबी चार्जिंग पोर्ट आणि डय़ुअल टोन सीट कव्हर देण्यात आला आहे.

– किंमत – 50 हजार 434 रुपये (दिल्ली एक्स-शोरुम)