|Monday, January 22, 2018
You are here: Home » Top News » लालूप्रसाद यादव हे ‘खुजलीवाला कुत्ता’ ; अनिल विज यांचे वादग्रस्त वक्तव्य

लालूप्रसाद यादव हे ‘खुजलीवाला कुत्ता’ ; अनिल विज यांचे वादग्रस्त वक्तव्य 

ऑनलाईन टीम / अंबाला :

पंतप्रधान नरेंद मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सतत टीका करणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘खुजलीवाला कुत्ता’ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त वक्तव्य करुन सतत चर्चेत राहणाऱया विज यांनी लालूप्रसाद यादव यांना ‘खुजलीवाला कुत्ता’ म्हणून उल्लेख केल्याने नवा वाद उफळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे वक्तव्य करुन भुंकणाऱया व्यक्तींकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही विज म्हणाले. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर हल्लाबोल करत म्हणाले, पंतप्रधान हे हुकूमशाह आहेत. ते देशाचे तुकडे-तुकडे करुन देशाचे नुकसान करतील, असे म्हणाले होते. त्यानंतर आता विज यांनी हे वक्तव्य केले.

Related posts: