नोटाभरणा प्रकरणी जेष्ठ व्यक्तींची चौकशी नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱया जेष्ठ नागरिकांनी 5 लाखापर्यंत आपल्या बँक खात्यात रोख रक्कम जमा केल्यास त्यांची चौकशी करण्यात येणार नाही. मात्र सामान्य नागरिकांनी 2.5 लाख रुपयांची मर्यादा कायम राहणार आहे, असे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीची चौकशी करणे अवघड बाब आहे. 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत बँक खात्यात रोख रक्कम जमा केलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या बँक खाते तपासणे कठीण गोष्ट आहे. जर कोणत्याही 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱया जेष्ठ नागरिकांने 2.5 लाखापेक्षा अधिक रक्कम गोळा केल्यास प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर जास्त खुलासा करावा. अशा व्यक्तीचा गेल्या वर्षाच्या प्राप्तिकर परताव्याबरोबर माहिती जुळत असल्यास चौकशी करण्यात येणार नाही. मात्र कोणतयही स्त्रोताशिवाय जास्त उत्पन्न असल्याचे निदर्शनात आल्यास कारवाई करण्यात येईल, असे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱयाने सांगितले.
नागरिकांनी ई-व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांच्या पुन्हा चौकशी करण्यात येणार नाही. नागरिकांना चौकशीच्या जाचातून मुक्तता करण्यासाठी ऑनलाईन तपासणी करण्यावर विभाग भर देणार आहे. पुढील महिन्यापासून ऑपरेशन क्लीन मनी उपक्रमाची दुसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे. सध्या नागरिकांना एसएसएस आणि ई-मेल प्राप्तिकर विभागाकडून पाठविण्यात येत आहे. त्याचे ऑनलाईन उत्तर देण्यात यावे, यामुळे त्यांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मोठय़ा प्रमाणात जमा करणाऱया व्यक्तींची तपास करण्यात येत आहे.