|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप

काँग्रेस नेत्यावर बलात्काराचा आरोप 

पाटणा

 बलात्काराचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर बिहार काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रजेश पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ब्रजेश यांच्यावरील आरोप बिहारच्या एका माजी मंत्र्याच्या मुलीने केला होता. या प्रकरणी माजी आयएएस अधिकाऱयाचा मुलगा निखिल प्रियदर्शी देखील आरोपी आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पीडितेने दोघांवर सेक्स रॅकेट चालविण्याचा आणि मारहाणीचा आरोप केला आहे.

ब्रजेश आणि निखिल यांच्याद्वारे चालविल्या जाणाऱया सेक्स रॅकेटमध्ये 100 पेक्षा अधिक युवती असल्याचा दावा पीडितेने केला. या प्रकरणी एसआयटीने चौकशी सुरू केली आहे. एसआयटीने ब्रजेशच्या अटकेसाठी त्याच्या घरावर छापा टाकला, परंतु तो तेथून फरार झाला होता.

काँग्रेस अडचणीत

या खटल्यात पक्षाच्या नेत्याचे नाव आल्याने काँग्रेसला नामुष्की सहन करावी लागली. विरोधक ब्रजेशवर कारवाईची मागणी करत होते. पांडे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे काँग्रेस प्रवक्ते हरखू झा यांनी सांगितले. कटानुसार गलिच्छ आरोपात मला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा ब्रजेशने केला आहे.

Related posts: