|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘राधाकृष्ण’ ने प्रथम क्रमांकासह केंद्रही आणले खेचून!

‘राधाकृष्ण’ ने प्रथम क्रमांकासह केंद्रही आणले खेचून! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 56 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाटय़ स्पर्धेत रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचच्या ‘सं. स्वरसम्राज्ञी’ नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. प्रथम क्रमांकासह ‘सं. स्वरसम्राज्ञी’ नाटकासाठी मिलिंद टिकेकर यांना दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, गायनासाठी स्वप्नील गोरे, तसेच संध्या सुर्वे यांना रौप्यपदक, तर तबलासाथीसाठी केदार लिंगायत यांना द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. रत्नागिरीचे नाटक प्रथम आल्याने नियमानुसार पुढीलवर्षीसाठी संगीत राज्य नाटय़ स्पर्धेचे रत्नागिरी केंद्र निश्चित झाल्याने रत्नागिरीतील संगीत रसिकांमध्ये उत्साह आहे.

यावर्षी 56 वी संगीत राज्य नाटय़ स्पर्धा सांगली येथे रंगली. स्पर्धेत एकूण 26 नाटके सादर झाली. यामधून राधाकृष्ण कलामंचने दमदार सादरीकरण करत प्रथम क्रमांक प्राप्त केला. रत्नागिरी केंद्रावर सलग तीन वर्षे स्पर्धेचे केंद्र राहिल्यानंतर गतवर्षी सांगलीचे नाटक प्रथम आले, त्यामुळे स्पर्धेचे केंद्र ाांगली येथे हलविण्यात आले. त्यामुळे येथील संगीत नाटय़रसिकांचा हिरमोड झाला होता. मात्र आता यावर्षी राधाकृष्ण कलामंचच्या रूपाने प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने नियमानुसार पुढीलवर्षी रत्नागिरी केंद्रावर संगीत राज्य नाटय़ स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे येथील राधाकृष्ण कलामंचचे संगीत नाटय़क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

रत्नागिरीतील एकूण 9 कलावंतांनी आपल्या सादरीकरणाने परिक्षकांचा कौल मिळवला. यामध्ये मिलिंद टिकेकर यांना दिग्दर्शनाचे प्रथम (सं. स्वरसम्राज्ञी), प्रशांत साखळकर यांना नेपथ्यासाठी प्रथम (सं. स्वयंवर), दादा लोगडे यांना नेपथ्यासाठी द्वितीय (सं. प्रीतीसंगम), केदार लिंगायत यांना तबलासाथीसाठी द्वितीय (सं. स्वरसम्राज्ञी), गायन रौप्यपदकासाठी स्वप्नील गोरे, संध्या सुर्वे (सं. स्वरसम्राज्ञी), गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र सिद्धी बोंद्रे (सं. स्वयंवर), तर अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र दिप्ती कानविंदे (सं. प्रीतीसंगम), नितीन लिमये (सं. स्वरसम्राज्ञी) यांना प्राप्त झाले आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेः- प्रथम क्रमांक – राधाकृष्ण कलामंच-रत्नागिरी (नाटक-सं. स्वरसम्राज्ञी), द्वितीय- देवल स्मारक मंदिर-सांगली (नाटक-सं. संशयकल्लोळ), तृतीय-अभिनव कला थिएटर-गोवा (सं. सौभद्र).

दिग्दर्शनः- प्रथम पारितोषिक- मिलिंद टिकेकर (सं. स्वरसम्राज्ञी), द्वितीय- शशांक लिमये (सं. संशयकल्लोळ). नेपथ्यः- प्रथम पारितोषिक- प्रशांत साखळकर (सं. स्वयंवर), द्वितीय- दादा लोगडे (सं. प्रितीसंगम). नाटय़लेखनः- प्रथम पारितोषिक- आपा बाबलो गावकर (सं. करवीर सौदामिनी), द्वितीय- नरेंद्र नाईक (सं. देवा तुझा मी सोनार). संगीत दिग्दर्शनः- प्रथम पारितोषिक- दशरथ राऊत (सं. राधामानस), द्वितीय- शिवानंद दाभोलकर (सं. परब्रह्म आले भेटी).

संगीतसाथ ऑर्गन :- प्रथम पारितोषिक- दत्तराज सुर्लकर (सं. सौभद्र), द्वितीय- सुशील गद्रे (सं. स्वयंवर). संगीतसाथ तबला- प्रथम- दत्तराज शेटय़े (सं. सौभद्र), द्वितीय- केदार लिंगायत (सं. स्वरसम्राज्ञी). संगीत व गायन रौप्यपदक :- स्वप्नील गोरे (सं. स्वरसम्राज्ञी), कृष्णा चारी (सं. सौभद्र), संध्या सुर्वे (सं. स्वरसम्राज्ञी), श्रद्धा जोशी (सं. संशयकल्लोळ). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- नितीन जोशी (सं. एकच प्याला), दिनकर म्हैसकर (सं. संशयकल्लोळ), शमिका जोशी (सं. प्रितीसंगम), जुई बर्वे (सं. संशयकल्लोळ)

गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः-सिद्धी बोंद्रे (सं. स्वयंवर), धनश्री गाडगीळ (सं. संशयकल्लोळ), अमृता बेडेकर (सं. संशयकल्लोळ), श्रद्धा जोशी (सं. सौभद्र), रूद्रा मुसळे (सं. मदनाची मंजिरी), दत्तगुरू केळकर (सं. परब्रह्म आले भेटी), विठ्ठल गवस (सं. सौभद्र), अभिषेक काळे (सं. संशयकल्लोळ), दशरथ नाईक (सं. भानुदास करी विठू माहेरी), संजय धुपकर (सं. मत्स्यगंधा).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रेः- दिप्ती कानविंदे (सं. प्रितीसंगम), मृदुला अय्यर (सं. शतजन्म शोधीताना), मंजिरी म्हसकर (सं. राधामानस), अनुराधा गावकर (सं. करवीर सौदामिनी), संपदा नवाथे (सं. करवीर सौदामिनी), नितीन लिमये (सं. स्वरसम्राज्ञी), दिनेश गोरेगावकर (सं. शतजन्म शोधिताना), गुरूप्रसाद आचार्य (सं. मदनाची मंजिरी), डॉ. श्रीपाद जोगळेकर (सं. मदनाची मंजिरी), प्रदीप हरमलकर (सं. ययाती आणि देवयानी).